पुन्हा एकदा निरुद्देश्य भटकंती....

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०११

कालच्या रवीवारी सकाळी सकाळी बाईक काढली आणि बाहेर पडलो. कुठे जायचं असं काहीच ठरलं नव्हतं. त्यामुळे रस्ता मिळेल तसं जात राहीलो. खडकवासला ओलांडून पानशेतच्या मार्गाला लागलो. मध्येच एका ठिकाणी एक मोठा जलाशय दिसला म्हणून थांबलो. बहुदा वरसगाव किंवा पानशेत धरणाचे बॅकवॉटर असावे.

प्रचि १



तिथंच रोडच्या मध्येच ठाण मांडून बसलेला हा दोस्त त्याचा फोटो काढल्याशिवाय पुढे जावू देइल असे वाटले नाही.
प्रचि २



शेवटी साडे अकरा-बारा च्या दरम्यान कंटाळा आल्याने एका हॉटेलात जेवायला म्हणून थांबलो. तिथे टिपलेला हा जास्वंद...

प्रचि ३: जास्वंद १


प्रचि ४: जास्वंद २


प्रचि ५: जास्वंद ३


प्रचि ६: जास्वंद ४


जेवण आटोपून बाहेर पडताना हे साहेब टेक ऑफच्या पवित्र्यात दिसले. फटाफट ३-४ स्नॅप्स मारुन घेतले.

प्रचि ७: इमाईन १


प्रचि ८: इमाईन २


प्रचि ९: इमाईन ३


प्रचि १०: इमाईन ४


शेवटी माझा चिकटपणा पाहून तोच कंटाळला असावा. शेवटचा स्नॅप चुकवला पठ्ठ्याने माझा.

प्रचि ११: इमाईन ५


विशाल....

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh