विशाल .....

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०११

जायंट वुड स्पायडर(Nephila maculata) याला मराठीत काय म्हणायचे? विशाल जंगली कोळी...? ;)
परवा कर्नाळ्याच्या जंगलात फ़िरताना मला या प्रजातीतले कोळी आढळले. त्यांना आपल्या कॅमेरात टिपायचा मोह मला आवरला नाही.


हे मुख्यत्वेकरुन जपान,ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम भारतात आढळतात. पापुआ न्यू गिनी आदिवासी प्रजातीमध्ये या विशाल कोळ्यांचा स्वादिष्ट भोजन म्हणुन उपयोग केला जातो.


जपानमध्ये त्यांना "ओ ज्योरौ गुमो" (O-jyorou gumo)या नावाने संबोधले जाते.बहुदा "gumo" म्हणजे कोळी आणि jyorou म्हणजे प्रचंड,विशाल!हे कोळी अतिशय घातक असतात. यांचे खास वैशिष्ठ्य म्हणजे पायावर खालच्या बाजुला पिवळ्या रंगाचे मोठे ठिपके असतात.यांचे जाळे किमान एक मिटर आणि कमाल ३-४ मीटर लांबीचेही असु शकते.


हे कोळी golden orb weaver प्रजातीमध्ये मोडतात, कारण यांचे जाळे (रेशिम(?))पिवळसर सोनेरी रंगाचे असते. जगातल्या इतर कुठल्याही कोळ्याच्या जाळ्यापेक्षा याचे जाळे जास्त मजबुत आणि चिवट असते. यां कोळ्यांची एकुण लांबी एक फ़ुटापासुन ४ फ़ुटापर्यंत असु शकते. (एका पायाच्या टोकापासुन दुसर्या पायाच्या टोकापर्यंत). त्यामुळे खुप वेळा छोटे पक्षी तसेच वटवाघळेसुद्धा या जाळ्यात अडकतात.

गंमत म्हणजे काही अंशी विषारी असली तरी ही प्रजाती अतिशय शांत आणि संकोची समजली जाते. बर्याचदा इतर छोटे-छोटे कोळी या विशाल वुड स्पायडरची अंडी, तसेच रेशिम (जाळे) चोरुन त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. आहे की नाही गंमत !

मग, यायचं कर्नाळ्याला? जायंट वुड स्पायडर बघायला.....

(चित्र मोठे करायला कृपया चित्रावर टिचकी मारा)

विशाल कुलकर्णी.

3 प्रतिसाद:

अपर्णा म्हणाले...

विशाल इथला wood जंगल अर्थी असावा...म्हणजे मराठीमधे मोठा जंगली कोळी म्हणता येइल...
BTW माझा एक भटकंती ब्लॉग आहे आणि आपल्या ब्लॉगची कापड एकाच ताग्यातली दिसताहेत...

ऊर्जस्वल म्हणाले...

"विशाल जंगलातला कोळी"

वूडचा एक अर्थ इंग्रजीत जंगल (दाट जंगल) असाही होतो.

इथे विशाल हे जंगलाचे विशेषण वाटते, कोळ्याचे नसावे.

आम्ही असेच कोळी उदिशातल्या तप्तपाणीच्या जंगलात पाहिले होते.

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

हात्तीच्या, मी पण कधी कधी जाम मुर्खपणा करतो. हा अर्थ मलाही माहीत होता पण माझ्या डोक्यातच आले नाही ते. धन्यवाद अपर्णा, ऊर्जस्वलजी :)

टिप्पणी पोस्ट करा

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh