आय मिस यु माय होम...स्वीट होम...!!

मंगळवार, ५ एप्रिल, २०११

काळ-वेळेचे कुठलेही बंधन नाही. आपल्यावर कुणी नजर तर ठेवून नाही ना (घरचा आय.टी.वाला) याची भिती नाही. असे क्षण आयुष्यात खुप कमी येतात. माझ्यासारख्या सेल्सवाल्याच्या नशिबात तर खुपच कमी. कारण इतर कुणी नसले तरी माझे कस्टमर सदैव फ़ोन करून मला त्रास देणे हे आपले कर्तव्यच मानतात.

त्यामुळे सोलापूरी घरी गेलो मी प्रत्येक क्षण ना क्षण भोगून घेतो. नेहमीची फॉर्मल वेअरची अट नसते. (विशु, ती बरमुडा काढून आधी ट्रॅक पँट घाल बरं. इति सौभाग्यवती :P ) की असेच बसले पाहीजे तसेच बसले पाहीजे अशी कुठली बंधने नसतात.(नीट मांडी घालुन बैस, नाहीतर खुर्चीवर व्यवस्थीत बैस, अजागळासारखा फ़तकल मारून बसू नकोस. इति सौ. :D)
इथे कोणीही विचारणारे नसते.

"विशु, स्वयंपाक झालाय, ताटे , पाणी घे आता" या ऐवजी "विशु, जेवायला खाली येतोयस की वरच देवू पाठवून ताट" अशी आईची प्रेमळ हाक कानी येते.

"आता थोडं बाजुला ठेव ते पुस्तक, जणु पुस्तक नाही माझी सवतच आणुन ठेवलीय घरात" ऐवजी...
"अरे, जरा ताटात बघून जेवावं, पुस्तक नंतर वाच" अशी सौम्य स्वरातली ती. आण्णांची समजावणी कानी येते.

हाय्य्य...., आय मिस यु माय डिअर होम, स्वीट होम !


आणि माझ्या घरातली माझी आवडती जागा. सोलापूरात असलो की मी कुठलेना कुठले पुस्तक घेवून इथे पडिक असतो.


आता फ़क्त ही पोस्ट आमच्या सौभाग्यवतींनी वाचू नये म्हणजे मिळवली. ;)

विशाल....

4 प्रतिसाद:

अनामित म्हणाले...

Hello, khup aanand jhala vachun ki tumhi solapurche aahat. Majhe maher pan solapur. Me tumache sarva blog vachale. The way you write is just amazing. Sadhi aani sopi bhasha. Mage ekada me comment Dili hoti pan publish nahi jhali. Anyways asech chan chan likhan karat raha. All the best. Sneha,Singapore.

विशाल म्हणाले...

नमस्कार स्नेहा,
सर्वप्रथम क्षमस्व, तुमच्या यापूर्वीच्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल. तूम्ही कुठल्या पोस्टवर तो अभिप्राय दिला होता ते सांगाल का? मी चेक करेन. तूम्ही सोलापूरच्या आहात हे वाचून खुप छान वाटले. सोलापूरात कुठे घर आहे तूमचे? मी सैफ़ुलजवळ राहतो. (अर्थात आता आई-बाबा आणि धाकटा भाऊ असतात तिथे, मी नोकरीनिमीत्त मुंबईत असतो)असो..
प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार !!

अनामित म्हणाले...

Hello, khup chan vatale tumacha reply vachun. Majhe maher aasara society madhye aahe. Me ya purvi mavalatya dinakara var comment Dili hoti. Anyways all the best. Thank you for replying. Waiting for the next post. Sneha.

विशाल म्हणाले...

इथे मला पेंडिंग मॉडरेशन मध्ये एकही कमेंट दिसत नाहीये त्या पोस्टवर. बहुदा काहीतरी गडबड झाली असावी. असो, धन्यवाद ! यापुढे तसे होणार नाही याची खात्री बाळगा. :)

टिप्पणी पोस्ट करा

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh