कातरवेळ...

बुधवार, ६ एप्रिल, २०११


कलंगूटच्या समुद्रकिनार्‍यावर टिपलेली एक कातरवेळ.....

********************************************************************************

दिनमणी बुडाला कातरवेळा झाली
मनोमनी क्षितीजा बावरली,
हलकेच लागता चाहूल सख्याची...
लाजूनी प्रिया आरक्त जाहली !

 
********************************************************************************
विशाल

आय मिस यु माय होम...स्वीट होम...!!

मंगळवार, ५ एप्रिल, २०११

काळ-वेळेचे कुठलेही बंधन नाही. आपल्यावर कुणी नजर तर ठेवून नाही ना (घरचा आय.टी.वाला) याची भिती नाही. असे क्षण आयुष्यात खुप कमी येतात. माझ्यासारख्या सेल्सवाल्याच्या नशिबात तर खुपच कमी. कारण इतर कुणी नसले तरी माझे कस्टमर सदैव फ़ोन करून मला त्रास देणे हे आपले कर्तव्यच मानतात.

त्यामुळे सोलापूरी घरी गेलो मी प्रत्येक क्षण ना क्षण भोगून घेतो. नेहमीची फॉर्मल वेअरची अट नसते. (विशु, ती बरमुडा काढून आधी ट्रॅक पँट घाल बरं. इति सौभाग्यवती :P ) की असेच बसले पाहीजे तसेच बसले पाहीजे अशी कुठली बंधने नसतात.(नीट मांडी घालुन बैस, नाहीतर खुर्चीवर व्यवस्थीत बैस, अजागळासारखा फ़तकल मारून बसू नकोस. इति सौ. :D)
इथे कोणीही विचारणारे नसते.

"विशु, स्वयंपाक झालाय, ताटे , पाणी घे आता" या ऐवजी "विशु, जेवायला खाली येतोयस की वरच देवू पाठवून ताट" अशी आईची प्रेमळ हाक कानी येते.

"आता थोडं बाजुला ठेव ते पुस्तक, जणु पुस्तक नाही माझी सवतच आणुन ठेवलीय घरात" ऐवजी...
"अरे, जरा ताटात बघून जेवावं, पुस्तक नंतर वाच" अशी सौम्य स्वरातली ती. आण्णांची समजावणी कानी येते.

हाय्य्य...., आय मिस यु माय डिअर होम, स्वीट होम !


आणि माझ्या घरातली माझी आवडती जागा. सोलापूरात असलो की मी कुठलेना कुठले पुस्तक घेवून इथे पडिक असतो.


आता फ़क्त ही पोस्ट आमच्या सौभाग्यवतींनी वाचू नये म्हणजे मिळवली. ;)

विशाल....

गुलाबी राजकन्या...

सोमवार, ४ एप्रिल, २०११

आमच्या बाल्कनीत फ़ुललेली गुलाबी रंगाची नाजुक राजकन्या...








आहे की नाही, लाखात देखणी?

विशाल..

मेघदूत...

शुक्रवार, १ एप्रिल, २०११

काही दिवसांपूर्वी अचानक ऑफ़ीसच्या कामानिमीत्त चेन्नईला जाण्याचा योग आला. सकाळी ७ वाजता मुंबईतून उडालो. विमान पुरेसे वर गेल्यावर अचानक खिडकीबाहेर लक्ष गेले आणि जे दृष्य़ दिसले ते भान हरपून टाकणारे होते. कालिदासाने वर्णीलेला मेघदूत कसा होता कोण जाणे, पण मला दिसलेला हा मेघदूत वेडावून टाकणारा होता. मोह आवरला नाही आणि विमानात कॅमेरा वापरण्याची अनुमती नसतानाही मी मोबाईल कॅमेरा वापरून त्या मेघदूताला कैद करून टाकले.




विशाल...

लोकप्रिय पोस्ट