आंतरराष्ट्रीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आंतरराष्ट्रीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

फ़्रिस्को...... !!!

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

यावेळच्या डेनव्हर दौर्‍यात ट्रेनींगचे पहीले दोन दिवस पार पडल्यावर दुसर्‍या दिवशी डिनरला 'लिसा'ची भेट झाली. 'लिसा वेदरबी' कोलोराडो प्रांतासाठी आमच्या कंपनीची (Trimble Positioning Group) बिझीनेस एरीया डायरेक्टर म्हणून काम पाहते. कुणीही प्रथमदर्शनी प्रेमात पडावे असे व्यक्तीमत्व आहे या बयोचे. मी ही पडलोच. ;)
जेवण (आणि अर्थातच वाईनही) संपल्यावर लिसाने अचानक विचारले... Hey Vishal, are you not coming for skiing? झाले असे होते की दुसर्‍या दिवशी स्कीईंगला जायची टूम निघाली होती. मला काय सांगावे सुचेना कारण स्कीईंगचा अनुभव नसल्याने मी आधीच एप्रिलला नाही म्हणून सांगितले होते. "Sorry Lisa, but I had never been to skiing and I don't even have necessary clothing for that with me." "So what, you are coming with us tomorrow and don't worry about outfits, I will arrange that." विशल्याची बोलती बंद. कारण माझ्या अप्रेझलचा रिव्ह्यु लिसाच करते. (मध्ये बसलेली लाल स्वेटरमधली 'लिसा' आहे) 1 दुसर्‍या दिवशी सकाळी ७.३० वाजता बस येणार होती. सात वाजता हॉटेलच्या अटेंडंटने मला एक बॅग आणुन दिली. Lisa left this for you. त्यात सगळा गरम कपड्यांचा जामानिमा होता. आता कुठलेही कारण न सांगता तयार होणे भाग होते. बाहेर पडताना लिफ्टमध्ये 'अलॉईस' (ट्रिंबल, जर्मनी) भेटला. त्याने सांगितले, त्यात घाबरण्यासारखे काही नाहीये. तुला स्कीईंग नसेल करायचे तर ट्युबींग कर. ते तुलनेने सेफ आणि सोपे आहे. ट्युबींग म्हणजे काय तर मोठ्या-मोठ्या रबरी ट्युब असतात (अर्थातच फुगवलेल्या), त्या घेवून चढावर (उंच भागावर) जायचे. त्यात छानपैकी बसायचे आणि ट्युब वरून ढकलून द्यायची. ती प्रचंड वेगाने खाली जाते. अर्थात ट्युबींगसाठी खास ट्रॅक तयार केलेले असतात. त्यामुळे फारशी भीती नाही. झालाच तर थोडासा वेगाचा त्रास होइल इतकेच. मग कुठे जरा धीर आला. मी 'लिसा'ने दिलेली बॅग गळ्यात अडकवली आणि खांद्याला कॅमेरा आणि एका नव्या अनुभवासाठी सिद्ध झालो.जिथे आम्ही स्कीईंग/ट्युबींगसाठी जाणार होतो ते ठिकाण 'फ्रिस्को अ‍ॅडव्हेंचर क्लब' ब्रुमफिल्डपासुन साधारण दोन तासाच्या अंतरावर रॉकी पर्वतरांगामध्ये होते. त्यामुळे बस ठरवलेली होती. एकदाचे निघालो...... हॉटेलबाहेर ही परिस्थिती होती. 2 बस रॉकीजच्या मार्गाने निघाली आणि गोंधळ सुरू झाला. साऊथ आफ्रिकेहून आलेला 'झुयेर' आपल्यासोबत 'पोंगो'सारखे एक वाद्य घेवुन आलेला होता. त्याच्या सुरावर बसमध्येच थिरकणे सुरू झाले. माझे सगळे लक्ष बाहेर लागले होते. समोर रॉकीजच्या पर्वतरांगा दिसायला लागल्या आणि मी सावरून बसलो. रॉकीजच्या त्या पहील्या दर्शनानेच जाणिव झाली की आपण काय गमावणार होतो? 3 थोड्याच वेळात बसने रॉकीजच्या प्रांगणात प्रवेश केला... 4 5 6 हळु-हळू बसमधला कल्ला बंद पडून सगळेच बाहेरच्या निसर्गात रमायला सुरूवात झाली होती. दोनेक तासात आम्ही 'फ्रिस्को'च्या परीसरात येवून पोहोचलो होतो. 7 8 दोन महिन्यांपूर्वी केरळमध्ये फिरताना रंगांची जादू अनुभवली होती. पण पांढरा रंगदेखील इतके वेडे करू शकतो हा अनुभव नवीनच होता माझ्यासाठी. 9 एकदाचे आम्ही आमच्या डेस्टीनेशनला येवून पोहोचलो.. बाह्यदर्शन... 10 11 या इमारतीचेच फ्रिस्कोच्या आतील मैदावरून घेतलेले प्रचि 12 थोड्याच वेळात तिथल्या प्राथमिक औपचारिकता (म्हणजे ट्युबींग्/स्कीईंग करताना तुम्हाला काही झाल्यास फ्रिस्को जबाबदार नाही हे ठासून सांगणार्‍या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे) पुर्ण करून आम्ही ट्युबींग्/स्कीईंगसाठी तयार झालो. 13 इथे आल्यावर माझ्या लक्षात आले की स्कीइंग करणारे खुप कमी होते. बहुतेकांनी ट्युबींगचाच पर्याय निवडला होता. आम्ही पण आपल्या वाट्याची ट्युब ताब्यात घेतली आणि निघालो. (यावेळी का कोण जाणे मला स्वतःचाच क्रुस खांद्यावर घेवुन जाणार्‍या ख्रिस्ताची आठवण येत होती ;) ) उगाचच मनात भीती वाटत होती की ट्युब वेगाने घसरत खाली येताना जर चुकून आपण त्यातून ट्युबच्या बाहेर फेकले जावून खाली घसरलो तर...... आपापले क्रुस आपलं ट्युब्स ओढत निघालेला आमचा जत्था... 14 15 सुदैवाने वरपर्यंत जाण्यासाठी सरकत्या पट्ट्याची (एस्कलेटर ?) सुविधा उपलब्ध होती, त्यामुळे त्या जडच्या जड ट्युब्स ओढत समोरचा चढ तोही बर्फाच्छादीत कसा चढणार ही काळजी दूर झालेली होती. मी माझा कॅमेरा क्लबवरच ठेवलेला होता. त्यामुळे हे सगळे फोटो माझ्या ब्लॅकबेरीने काढलेले आहेत. 16 17 18 19 20 21 शेवटी एकदाचे वरच्या टोकाला जाऊन पोहोचलो. तिथे क्लबचे दोन कर्मचारी आमचा कडेलोट करायला सहर्ष आणि सुहास्य वदनाने हजर होते. ;) त्या हिरोने दात दाखवतच आम्हाला ट्युबवर बसवले आणि एक, दोन साडे माडे तीन करत खालच्या दिशेने ढकलून दिले. ट्युब थोडा वेळ वेगाने सरळ खाली उतरली, मध्येच एका ठिकाणी किंचीत चढ होता, त्यावर चढताना गरकन स्वतःभोवतीच फिरली आणि त्यानंतर जवळ-जवळ तीन ते चार मिनीटे तशी स्वतःभोवती गरगर फिरत वेगाने खालच्या बाजूला सरकत राहीली. सुरुवातीला काहीवेळ डोळे गरगरले, पण नंतर मजा यायला लागली. मग काय त्यानंतर तासभर हेच चालू होते. ट्युब ओढत वरच्या बाजूल घेवुन जायची. छानपैकी पाय पसरून ट्युबवर बसायचे आणि बुंsssssग... काही वेळानंतर तर आम्हाला त्या कर्मचार्‍यांचीसुद्धा गरज पडेनासी झाली. स्वतःचा पळत-पळत ट्युब ओढत आणायची आणि शेवटच्या क्षणाला स्वतःला ट्युबवर झोकून द्यायचे. अर्थात हे सगळे प्रकार करताना कॅमेरा, अगदी मोबाईलचाही वापरण्याचा अविचार केला नाही. अगदी निग्रहाने तो मोह टाळला त्यामुळे ते प्रत्यक्ष फोटो, शुटींग नाही घेता आले. पण मझा आला.... "थँक्स लिसा, तू जर आग्रह केला नसतास तर मी एका विलक्षण आनंदाला मुकलो असतो." वरून वेगात येणार्‍या ट्युब्स बर्फाच्या या ढिगार्‍यावर येवुन स्लो व्हायच्या.. 24 25 26 27 22 23 इथे मनसोक्त खेळून झाल्यावर अर्थातच पोटातच कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे जवळच्याच एक 'ब्रिवरी'(सोत्रि याचा बरोबर उच्चार सांगू शकतील. ब्रिवरी म्हणजे जेथे बीअर तयार केली जाते) कडे प्रस्थान केले गेले. तिथेच खादाडी आणि पिदाडी सुद्धा.... :beer: आधी अर्थातच तिथे रोजच्या रोज तयार केल्या जाणार्‍या ताज्या, घरगुती बीअरचा मनमुराद आस्वाद घेतला. हे बघा तिथे तयार होणार्‍या बीअरचे 'पिगलेट्स' ;) 29 आणि त्यानंतर खादाडी करून परतीच्या वाटेला लागलो. 28 बाकीचं पुढच्या वेळी... (मी क्रमशः लिहीलेलं नाहीये बर्का) इरसाल म्हमईकर

हिमगौरी (?) च्या शोधात : अखेर

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

मागच्या ठिकाणी पण निराशाच पदरी पडली. आता शेवटची काही ठिकाणे जिथे हिमगौरी हमखास सापडू शकेल अशी उरली होती. दुसर्‍या दिवशी तिकडे हल्लाबोल केला. मायबोलीवरील चाणाक्ष स्त्री-वर्गाने ओळखले असेलच अशी ठिकाणे कोठली ते?

प्रचि १
बोल्डर येथील शॉपींग एरिया.....



प्रचि २
जिकडे बघावे तिकडे दुकानेच-दुकाने...
प्रत्येक ठिकाणी डिस्काऊंटच्या पाट्या....



प्रचि ३
नोप, ती तू नक्कीच नव्हेस ....!



प्रचि ४
बोल्डरला नुसतीच खादाडी आटोपुन पुढे 'कॅसलरॉक' मॉलला प्रयाण केले. खरेतर मॉलला जायला मला अजीबात आवडत नाही. (विनाकारण नको असलेल्या वस्तु गळ्यात पडतात आणि खिश्याला चाट बसते)
पण 'कॅसलरॉक' हा प्रकारच अजब होता. मॉल म्हणल्यावर डोळ्यासमोर उभी राहते एखादी पुष्कळ दुकाने असलेली अवाढव्य बहुमजली इमारत. पण इथे एक छोटेसे गावच वसलेले होते. फक्त शॉपींग ! (कुलकर्णी बाई आनंदाने वेड्याच झाल्या असत्या आणि मी खिश्याला चाट बसल्याने)



प्रचि ५
विकडे असल्याने आज हा भाग बर्‍यापैकी शांत होता. अधुन मधुन माझ्यासारखे चुकार (रस्ता चुकलेले ;) )
पर्यटकच काय ते दिसत होते.


प्रचि ६


प्रचि ७
इथे पण बर्फाळ पर्वतरांगांची सोबत होतीच..


प्रचि ८
कितीही आणि काहीही घ्यायचे नाही असे ठरवले तरी जगातल्या सगळ्या विख्यात ब्रँड्सवर किमान ४०% सुट मिळतेय हे पाहिल्यावर मोह होणे साहजिकच होते. बर्‍याच प्रमाणात खिश्याला चाट बसल्यावर भानावर आलो आणि घड्याळात पाहीले. दुपारचे ४.३० वाजत आले होते. तेव्हा आटोपते घेवुन हॉटेलकडे परत निघालो.
मध्ये वॉलनट क्रिकमध्ये कुठेतरी जेवण करायचे आणि हॉटेलवर परत....
इथे माझ्या कॅमेर्‍याच्या बॅटरीने दावा साधला होता, त्यामुळे पुढचे फोटो मोबाईलच्या कॅमेर्‍याने काढले..


प्रचि ९
वॉलनट क्रिक ही वेस्टमिंन्स्टर्सची विख्यात खाऊगल्ली कम शॉपींग सेंटर (नॉट अगेन) आहे. त्यामुळे इथेही परत सटर फटर खरेदी झालीच.


प्रचि १०


प्रचि ११
बघा रे कुठे दिसतेय का ते?


प्रचि १२
जेवण करुन निवांत एका दुकानाबाहेरील बेंचवर बसलो होतो, तेवढ्यात फोन वाजला. घरुन होता....
काय करतोयस?
"ऐक , आज सॉलीड खरेदी केलीये. खुश होवून जाशील."
"ते सोड, तू परत कधी येतोयस? मला जाम कंटाळा आलाय आता.....
मिसींग यु ! आज शेवटचा दिवसा आहे, उद्या परत फिरतोयस ना?
टण्ण...टण्ण.....
कुठेतरी आत घंटा वाजली. मला माझी हिमगौरी सापडली होती. भले ती हिमगौरी नसेल पण माझी तर आहे ना......!
दिल खुश हो गया..........



प्रचि १३
आता परतीचे वेध.....


विशाल.

हिमगौरीच्या शोधात : भाग ३

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

तू छुपी है कहाँ....
मै तडपता यहाँ......

बटरफ्लाय पॅव्हेलियनमधून जड मनाने बाहेर पडलो. हिमगौरी काही सापडलीच नव्हती. वश असलेले कर्णपिशाच्च प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच बातमी घेवुन येत होते. यावेळी त्याने एका नव्या ठिकाणाचा पत्ता आणला होता. त्याच्यामते हिमगौरी इथे सापडण्याची दाट शक्यता होती.

प्रचि १


प्रचि २
मोनेट पुल...


आमचे स्वारस्य हिमगौरीच्या शोधात होते, त्यामुळे इतर काही न शोधता आम्ही हिमगौरी सापडण्याची संभावित ठिकाणे धुंडाळायला सुरुवात केली.

प्रचि ३


प्रचि ४


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


प्रचि ८


प्रचि ९
स्मोक फ्लॉवर्स....


प्रचि १०


प्रचि ११


प्रचि १२


प्रचि १३


प्रचि १४


प्रचि १५


प्रचि १६


प्रचि १७


प्रचि १८


प्रचि १९


प्रचि २०


प्रचि २१


प्रचि २२


प्रचि २३


प्रचि २४


प्रचि २५


प्रचि २६


प्रचि २७


प्रचि २८


इथे पण निराशाच पदरी पडली. आता शेवटची काही ठिकाणे जिथे हिमगौरी हमखास सापडू शकेल अशी उरली होती. उद्या तिकडे हल्लाबोल...............!!!

विशाल

लोकप्रिय पोस्ट