सहज सुचलं म्हणून... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सहज सुचलं म्हणून... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

माझ्या घराच्या गच्चीवरून....

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११

ऐन मुंबईजवळ जर अशा ठिकाणी तुमचे घर असेल तर इतरांना तुमचा हेवा वाटणे साहजिकच आहे ना? :)
स्थळ : पनवेलपासुन ५ किमी अंतरावर जुन्या माथेरान रोडवरील नेरे गाव
माझ्या नवीन घराच्या इमारतीच्या टेरेसवरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर....

प्रचि १



प्रचि २



प्रचि ३



प्रचि ४



प्रचि ५



प्रचि ६



प्रचि ७



विशाल...

आय मिस यु माय होम...स्वीट होम...!!

मंगळवार, ५ एप्रिल, २०११

काळ-वेळेचे कुठलेही बंधन नाही. आपल्यावर कुणी नजर तर ठेवून नाही ना (घरचा आय.टी.वाला) याची भिती नाही. असे क्षण आयुष्यात खुप कमी येतात. माझ्यासारख्या सेल्सवाल्याच्या नशिबात तर खुपच कमी. कारण इतर कुणी नसले तरी माझे कस्टमर सदैव फ़ोन करून मला त्रास देणे हे आपले कर्तव्यच मानतात.

त्यामुळे सोलापूरी घरी गेलो मी प्रत्येक क्षण ना क्षण भोगून घेतो. नेहमीची फॉर्मल वेअरची अट नसते. (विशु, ती बरमुडा काढून आधी ट्रॅक पँट घाल बरं. इति सौभाग्यवती :P ) की असेच बसले पाहीजे तसेच बसले पाहीजे अशी कुठली बंधने नसतात.(नीट मांडी घालुन बैस, नाहीतर खुर्चीवर व्यवस्थीत बैस, अजागळासारखा फ़तकल मारून बसू नकोस. इति सौ. :D)
इथे कोणीही विचारणारे नसते.

"विशु, स्वयंपाक झालाय, ताटे , पाणी घे आता" या ऐवजी "विशु, जेवायला खाली येतोयस की वरच देवू पाठवून ताट" अशी आईची प्रेमळ हाक कानी येते.

"आता थोडं बाजुला ठेव ते पुस्तक, जणु पुस्तक नाही माझी सवतच आणुन ठेवलीय घरात" ऐवजी...
"अरे, जरा ताटात बघून जेवावं, पुस्तक नंतर वाच" अशी सौम्य स्वरातली ती. आण्णांची समजावणी कानी येते.

हाय्य्य...., आय मिस यु माय डिअर होम, स्वीट होम !


आणि माझ्या घरातली माझी आवडती जागा. सोलापूरात असलो की मी कुठलेना कुठले पुस्तक घेवून इथे पडिक असतो.


आता फ़क्त ही पोस्ट आमच्या सौभाग्यवतींनी वाचू नये म्हणजे मिळवली. ;)

विशाल....

लोकप्रिय पोस्ट