स्थानिक भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्थानिक भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जिथे सागरा धरणी मिळते...

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

मागच्या महिन्यात एका विकांताला थेट लाडघर गाठले. आम्ही गुरुवारी संध्याकाळीच तिथे जावून धडकलेलो असल्याने वर्दळ अजिबातच नव्हती. कधी नव्हे तो समुद्रही अतिशय शांत सापडला होता.

दुसर्‍या दिवशी सकाळच्या वेळी टिपलेला समुद्र....

प्रचि १


प्रचि २


प्रचि ३


मावळतीच्या वेळीही अनपेक्षीतपणे शांत सापडलेला समुद्र...

प्रचि ४


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


प्रचि ८


प्रचि ९


लाटांनी रेखाटलेली अगदी प्रोफेशनल वाटावी अशी नक्षी...

प्रचि १०


पुढच्या दिवशी पहाटे उठून (म्हणजे सहा-साडे सहा वाजता ;) ) फिरायला गेलो. त्यावेळी टिपलेला समुद्र....

प्रचि ११


समुद्रकिनारी थोडेसे टेकाडावर असलेले सरकारी गेस्ट हाऊस एखाद्या चित्रासारखे दिसत होते..

प्रचि १२


प्रचि १३


आंजर्ल्याच्या श्री गणेशाच्या (कड्यावरचा गणपती) दर्शनाला जाताना टिपलेला हर्णेचा समुद्रकिनारा...

प्रचि १४


शेवटी जिथे उतरलो होतो ते, अगदी बीचवरच असलेले "पिअर्स : द बीच रिसोर्ट"

प्रचि १५


प्रचि १६


विशाल कुलकर्णी

वर्षाविहार : भाजे लेण्यांच्या परिसरात

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

धुंद होवुन गरजतो पाऊस आहे हाय ओला बरसतो पाऊस आहे... रान हिरवे नाचले बेभान आता मोर होउन लहरतो पाऊस आहे...! जायचे ठरले होते लोहगडला ! पण निघायलाच उशीर झाल्याने भाज्याच्याच परिसरात भटकायचे असे ठरवले आणि उंडगायला निघालो. प्रचि १ पायथ्याला गाडी लावून सर्वप्रथम गरमागरम चहा मारला आणि पुढे निघालो. तर समोर उफ़ाणत कोसळणारा धबधबा स्वागताला उभाच होता... कुठल्याही भटकंतीची सुरूवात अशी सुरेख होणे यासारखे भाग्य नाही. नकळत उल्हास दरीची आठवण झाली, तिथे धबधबा शेवटी भेटला होता, तर इथे स्वारी स्वागतालाच हजर होती. प्रचि २ प्रचि ३ भाजे लेण्यांकडे जाताना सहज उजव्या बाजुला नजर गेली. सगळीकडे हिरवीगार राने पसरलेली. पाऊस मी म्हणत होता. त्या हिरवाईत लपलेलं मंदीर टिपायचा मोह काही आवरला नाही. प्रचि ४ डोंगराला जागोजागी फ़ुटलेले पाझर मन प्रसन्न करुन टाकत होते. प्रचि ५ आजुबाजुची हिरवाई इतकी मनोरम होती की मुळापासून उखडून पडलेल्या या ओंडक्याला देखील मोह सोडवत नसावा. प्रचि ६ फ़िरत फ़िरत एकदाचे भाजे लेणींपाशी येवून पोचलो. प्रचि ७ प्रचि ८ प्रचि ९ एका नैसर्गिक गुहेवरून ओघळणारे पावसाचे थेंब टिपण्याची संधी मीही सोडली नाही. यातला दुसरा फ़ोटो राजेंनी काढलेला आहे. ;) प्रचि १० प्रचि ११ लेण्यांच्या सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर असलेला हा अजुन एक धबधबा प्रचि १२ इथुन आता लोहगडाकडे जाणारी नागमोडी वाट स्पष्ट दिसत होती. प्रचि १३ या वाटेवर मध्येच भेटणारा हा अजुन एक धबधबा... प्रचि १४ धुक्यात हरवलेला लोहगड ! लोहगडाकडे पाहताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि नकळत अंग शहारून उठले. मनोमन पुढच्या वेळी लवकरात लवकर लोहगडाला भेट द्यायच्या निश्चयाची पुनरावृत्ती झाली. प्रचि १५ भाज्याच्या लेण्यांपाशी जमीनीवर पसरलेले पावसाचे पाणी प्रचि १६ तृप्त अस्मादिक लोहगडावर कधी जायचं पुन्हा? विशाल...

साहेब

मंगळवार, १५ मे, २०१२

काही दिवसांपुर्वी कात्रजच्या बागेत एकदाचे बॉसचे दर्शन घ्यायचा योग आला. तिथे पोहोचलो तेव्हा ही गर्दी उसळली होती. मी कसातरी गर्दीतुन आपले डोके आणि डोक्यावर उचलुन धरलेला कॅमेरा काढून आत घुसलो. पण पुढे काहीच नव्हतं. शेजारच्याला हळुच विचारलं... (जणुकाही माझं बोलणं समोरच्या जंगलात कुठेतरी दडून बसलेल्या त्या सायबाला ऐकुच जाणार होतं!)

कुठेय?

कुटं जावुन बसलय की राव, पंचीस मिन्टं झाली हुबा हाये हितं, पण जनावर भायेर यायाला तय्यारच न्है....

मी ही इतरांच्यात सामील झालो. अजुन थोडा पुढे सरकलो. डोळे ताणून ताणून कुठे दिसताहेत का साहेब हे बघायचा प्रयत्न करायला लागलो. इतक्यात पब्लिकमध्ये कुजबुज झाली...

आला...आला.....

मी पटकन कॅमेरा सरसावला आणि शेजारच्याला थोडं बाजुला सारत पुढे घुसलो. त्याने आधी कुरकुर केली पण हातातला कॅमेरा पाहताच तो ही बाजुला झाला.

नीट काढुन घ्या साहेब फोटो, मला ईमेल कराल?

मी त्याच्याकडे बघत होकारार्थी हसलो आणि पुढे सरकलो. जाळीतुन साहेब बाहेर आले आणि मी फोटो काढायचा विसरुनच गेलो. ते लांबलचक, देखणं , रुबाबदार व्यक्तीमत्व दिमाखात समोर उभ होतं. मी भान हरपल्यासारखा बघतच राहीलो.

साहेब, काढताय ना फोटो? लवकर काढा, नाहीतर परत जाळीत शिरेल तो....



साहेब जाळीत असलेल्या पाण्याच्या खळग्यापाशी आले. आधी पाण्याभोवती एक चक्कर मारून आजुबाजुचा अंदाज घेतला.



पाण्याच्या त्या खळग्याला पुर्ण चक्कर मारत महाशय या बाजुला आले आणि शेपटी ताणत सायबांनी आळस दिला.



डोहाला पुर्ण चक्कर मारुन पुन्हा एकदा पलिकडच्या तीरावरून डोहात उतरायची तयारी ...



त्यानंतर महाशयांनी आधी आपली तहान भागवून घेतली...



तहान भागवल्यानंतर मात्र उकाड्यापासून बचाव करण्यासाठी साहेबांनी सरळ पाण्याच्या त्या डोहात डुबकी मारली आणि तिथेच ठाण मांडून बसले.



शेजार्‍याचे फोटो आधी काढले म्हणून हे साहेब मात्र आमच्यावर जाम रुसुन बसले आणि पाठ फिरवूनच बसले.
बराच वेळ वाट बघीतली पण साहेबांचा रुसवा दुर होण्याचे चिन्ह दिसेना. मग शेवटी कंटाळून पुढच्या वेळी तुमचा नंबर आधी लावू असे प्रॉमीस केले तेव्हा शिष्ठपणाने एक पाठमोरीच पोझ दिली साहेबांनी.



सात वाजुन गेले होते. तिथले सुरक्षा रक्षक उद्यान बंद करण्याची वेळ झाल्याचे इशारे देत फिरु लागले आणि आम्ही साहेबांचा निरोप घेतला.

इरसाल म्हमईकर...


वर्षाविहार : भाजे लेण्यांच्या परिसरात

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११

धुंद होवुन गरजतो पाऊस आहे
हाय ओला बरसतो पाऊस आहे...
रान हिरवे नाचले बेभान आता
मोर होउन लहरतो पाऊस आहे...!

जायचे ठरले होते लोहगडला ! पण निघायलाच उशीर झाल्याने भाज्याच्याच परिसरात भटकायचे असे ठरवले आणि उंडगायला निघालो.

प्रचि १

पायथ्याला गाडी लावून सर्वप्रथम गरमागरम चहा मारला आणि पुढे निघालो. तर समोर उफ़ाणत कोसळणारा धबधबा स्वागताला उभाच होता...
कुठल्याही भटकंतीची सुरूवात अशी सुरेख होणे यासारखे भाग्य नाही. नकळत उल्हास दरीची आठवण झाली, तिथे धबधबा शेवटी भेटला होता, तर इथे स्वारी स्वागतालाच हजर होती.


प्रचि २



प्रचि ३

भाजे लेण्यांकडे जाताना सहज उजव्या बाजुला नजर गेली. सगळीकडे हिरवीगार राने पसरलेली. पाऊस मी म्हणत होता. त्या हिरवाईत लपलेलं मंदीर टिपायचा मोह काही आवरला नाही.


प्रचि ४

डोंगराला जागोजागी फ़ुटलेले पाझर मन प्रसन्न करुन टाकत होते.


प्रचि ५

आजुबाजुची हिरवाई इतकी मनोरम होती की मुळापासून उखडून पडलेल्या या ओंडक्याला देखील मोह सोडवत नसावा.


प्रचि ६

फ़िरत फ़िरत एकदाचे भाजे लेणींपाशी येवून पोचलो.


प्रचि ७



प्रचि ८



प्रचि ९

एका नैसर्गिक गुहेवरून ओघळणारे पावसाचे थेंब टिपण्याची संधी मीही सोडली नाही


प्रचि १०



प्रचि ११

लेण्यांच्या सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर असलेला हा अजुन एक धबधबा


प्रचि १२

इथुन आता लोहगडाकडे जाणारी नागमोडी वाट स्पष्ट दिसत होती.


प्रचि १३

या वाटेवर मध्येच भेटणारा हा अजुन एक धबधबा...


प्रचि १४

धुक्यात हरवलेला लोहगड ! लोहगडाकडे पाहताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि नकळत अंग शहारून उठले. मनोमन पुढच्या वेळी लवकरात लवकर लोहगडाला भेट द्यायच्या निश्चयाची पुनरावृत्ती झाली.


प्रचि १५

भाज्याच्या लेण्यांपाशी जमीनीवर पसरलेले पावसाचे पाणी


प्रचि १६

तृप्त अस्मादिक


लोहगडावर कधी जायचं पुन्हा?

विशाल...






लोकप्रिय पोस्ट