काही दिवसांपूर्वी अचानक ऑफ़ीसच्या कामानिमीत्त चेन्नईला जाण्याचा योग आला. सकाळी ७ वाजता मुंबईतून उडालो. विमान पुरेसे वर गेल्यावर अचानक खिडकीबाहेर लक्ष गेले आणि जे दृष्य़ दिसले ते भान हरपून टाकणारे होते. कालिदासाने वर्णीलेला मेघदूत कसा होता कोण जाणे, पण मला दिसलेला हा मेघदूत वेडावून टाकणारा होता. मोह आवरला नाही आणि विमानात कॅमेरा वापरण्याची अनुमती नसतानाही मी मोबाईल कॅमेरा वापरून त्या मेघदूताला कैद करून टाकले.
विशाल...
4 प्रतिसाद:
मस्त रे, मी विमानातून काढलेले फोटो आठवले!!!
विशालदा,छान आहे मेघदूत . ..
मस्तच आहेत फ़ोटो...विमान फ़क्त विशिष्ट उंचीवर जाईपर्यंत मला वाटतं कॅमेरा वापरु देत नाहीत त्यानंतर चालतं...हे फ़ोटो त्यानंतरचे असतील तर चालेल कॅमेरा वापरला तरी....:)
धन्यवाद मंडळी !!
अपर्णा, तूम्ही म्हणता तसेच असेल, कारण फ़ोटो काढताना एका हवाई सुंदरीने पाहीले होते मला, आणि नुसतीच एक मस्त स्माईल दिली ;)
धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा