गणपती बाप्पा मोरया !!

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११

श्री गजाननांच्या कृपेने सर्व मायबोलीकरांना सुख-सौख्य, समृद्धी आणि आयुरारोग्य लाभो हिच सदिच्छा आणि बाप्पांच्या चरणी विनम्र प्रार्थना !
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !!

अवनिशा..अलंपता
बुद्धीनाथा तू बुद्धीदाता
धार्मिका गौरीसुता
बुद्धी दे विनायका !

गजवक्त्रा.., एकदंता
चतुर्भुजा तू देवव्रता
सिद्धीपती विघ्नहर्ता
सौख्य दे गणनायका !

धुम्रवर्णा.., एकद्रिष्टा
मंगलमुर्ति गजानना
महाबळा मुक्तिदाता
सन्मति दे सिद्धीनाथा !

शुभगुणांकना सिद्धीप्रिया
शुभानना तू वक्रतुंडा
स्कंदपुर्वजा सिद्धीदायका
सामर्थ्य दे विघ्नेश्वरा !

अल्पमति मी भक्त तुझा
तु समृद्धी दे गणराया
विघ्न हरो चराचराचे
दे पसायदान वरदेश्वरा !


आमच्या घरी यावर्षी विराजमान झालेले बाप्पा !!

प्रचि १



प्रचि २



प्रचि ३



प्रचि ४



काही क्लोज-अप्स

प्रचि ५



प्रचि ६



प्रचि ७



प्रचि ८



प्रचि ९



गजानना श्री गणराया , आधी वंदु तूज मोरया !!
गणपती बाप्पा मोरया !!

विशाल.

0 प्रतिसाद:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट