स्वर्गाचे प्रवेशद्वार...

मंगळवार, ४ डिसेंबर, २०१२

मायबोलीवरील दिग्गज छायाचित्रकारांनी मुन्नारची एकाहून एक सुंदर छायाचित्रे आधीच टाकलेली आहेत. मी अजुन वेगळे काय देणार तरीही माझ्या नजरेतून एकदा मला भावलेलं मुन्नार पाहायला काय हरकत आहे... :)

प्रचि १
सकाळच्या वेळी पाण्यावर साचलेलं अलवार धुकं...


प्रचि २
छाया-प्रकाशाचा खेळ आणि पाण्यावर उमटलेलं प्रतिबिंब..


प्रचि ३
जिथवर नजर पोचेल तिथवर पसरलेला देखणा निसर्ग


प्रचि ४
कुणा नतद्र्ष्टाने हिरवाईला छेद देत मध्येच हा रस्ता पाडला असेल ?


प्रचि ५
मुन्नारच्या ढगाळ वातावरणात आकस्मिकपणे दर्शन देते झालेले श्रीयुत भास्करराव तेजस्वी !


प्रचि ६
गुलाबाच्या पानावर अंग-अंग सावरून बसलेलं हळुवार, लाजरं दंव...


प्रचि ७
ज्याच्या एका स्पर्शासाठी ते दंवही आसुसलंय तो पुष्पराज...


प्रचि ८
कुठे जावू? सगळीकडे भरपूर खाऊ दिसतोय...


प्रचि ९
पुरे झालं त्या गुलाबोचं कौतुक...


प्रचि १०
आत्ता बोला....,


प्रचि ११


प्रचि १२


प्रचि १३
आम्ही पण आहोत म्हटलं रांगेत...


प्रचि १४


प्रचि १५


प्रचि १६
रंग नसेल माझ्याकडे हिरवा, पण देखणेपणात मीही कमी नाही..


प्रचि १७
आवाज कुणाचा?


प्रचि १८
इथेच कुठेतरी स्वर्गाचे प्रवेशद्वार आहे म्हणे... :)


प्रचि १९


प्रचि २०


सद्ध्या एवढेच पुरे...
पुढच्या लेखात अजुन काही छायाचित्रे घेवून येइन तोपर्यंत ....

(मी क्रमशः म्हणलेलं नाहीये :D )

जिथे सागरा धरणी मिळते...

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

मागच्या महिन्यात एका विकांताला थेट लाडघर गाठले. आम्ही गुरुवारी संध्याकाळीच तिथे जावून धडकलेलो असल्याने वर्दळ अजिबातच नव्हती. कधी नव्हे तो समुद्रही अतिशय शांत सापडला होता.

दुसर्‍या दिवशी सकाळच्या वेळी टिपलेला समुद्र....

प्रचि १


प्रचि २


प्रचि ३


मावळतीच्या वेळीही अनपेक्षीतपणे शांत सापडलेला समुद्र...

प्रचि ४


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


प्रचि ८


प्रचि ९


लाटांनी रेखाटलेली अगदी प्रोफेशनल वाटावी अशी नक्षी...

प्रचि १०


पुढच्या दिवशी पहाटे उठून (म्हणजे सहा-साडे सहा वाजता ;) ) फिरायला गेलो. त्यावेळी टिपलेला समुद्र....

प्रचि ११


समुद्रकिनारी थोडेसे टेकाडावर असलेले सरकारी गेस्ट हाऊस एखाद्या चित्रासारखे दिसत होते..

प्रचि १२


प्रचि १३


आंजर्ल्याच्या श्री गणेशाच्या (कड्यावरचा गणपती) दर्शनाला जाताना टिपलेला हर्णेचा समुद्रकिनारा...

प्रचि १४


शेवटी जिथे उतरलो होतो ते, अगदी बीचवरच असलेले "पिअर्स : द बीच रिसोर्ट"

प्रचि १५


प्रचि १६


विशाल कुलकर्णी

पुष्पराज

आमच्या बाल्कनीतले पुष्पराज
प्रचि १


प्रचि २


प्रचि ३


प्रचि ४


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


विशाल

एक सुर्यास्त पर्थमधला....

त्या दिवशी डॅरेनतर्फे (माझा बॉस) आम्हाला, म्हणजे मी, हान यांग(चीन), विन्स्टन कोह(सिंगापूर), किथ डॉयर(ईस्ट ऑस्ट्रेलिया) आणि सारा मार्शल(न्युझीलँड) अशा आमच्या गृपला डीनरचे आमंत्रण होते. अजुन बराच वेळ असल्यामुळे अस्मादिकांनी समुद्रकिनार्‍यावर जावून सुर्यास्त अनुभवण्याची कल्पना मांडली जी सर्वानुमते संमत झाली. आम्ही राहात असलेले हॉटेल आणि समुद्रकिनारा यांच्यामध्ये एका पार्कींग लॉटचेच काय ते अंतर होते. त्यामुळे सगळे चालतच निघालो... हॉटेलच्या पार्किंगमधून बाहेर पडलो की समोर उभा राहणारा क्लॉक टॉवर..
प्रचि १
 
प्रचि २ हॉटेलकडून रस्त्याच्या त्या बाजुला असलेल्या समुद्रकिनार्‍याकडे जाताना...                                                                       
प्रचि ३
 
प्रचि ४
 
प्रचि ५
 
प्रचि ६
ही जी एखाद्या बुरुजासारखी बांधकामं दिसताहेत ना, तीथे स्वच्छ पाण्याचे नळ, तसेच शॉवर्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. समुद्रकिनार्‍यावर फिरुन आल्यानंतर हाता-पायाला लागलेली रेती झटकून स्वच्छ होण्यासाठी.
प्रचि ७
 
प्रचि ८
मधुनच आपले अस्तित्व दाखवून देणार्‍या इंद्रधनुष्याचे मनोहारी दर्शन झाले आणि हरखून गेलो.

प्रचि ९
 
प्रचि १०
त्याचवेळी समुद्राच्या विरुद्ध बाजुला म्हणजे शहराच्या दिशेला देखील अजुन एक इंद्रधनुष्य दिसु लागले होते
प्रचि ११
 
 प्रचि १२
 
प्रचि १३
सागर किनार्‍यावर येणार्‍या पर्यटकांना सावली आणि आरामासाठी बांधण्यात आलेल्या मंडपातून टिपलेला हा फोटो

प्रचि १४
थोड्याच वेळात पावसाची एक हलकीशी सर येवून गेली आणि वातावरण बदलायला सुरूवात झाली.
प्रचि १५
परतीच्या प्रवासाला लागलेल्या भास्कररावांचे निसटते दर्शन झाले
 
प्रचि १६
इतका वेळ आमची गप्पांची गाडी विविध ट्रॅक बदलत धावत होती. पण आता सगळेच स्तब्ध झालो.
प्रचि १७
 
प्रचि १८
 
प्रचि १९
 
प्रचि २०
 
प्रचि २१
 
प्रचि २२
 
प्रचि २३
 
 प्रचि २४
 
प्रचि २५
सागरकिनार्‍यावरील त्या भव्य मंडपाचा परतताना घेतलेला हा फोटो. मागे जी इमारत दिसत्येय ते 'हॉटेल रँदेव्ह्युज'! कंपनीने आमची मुक्कामाची सोय या हॉटेलात केलेली होती.
प्रचि २६
इथून थेट पोटपुजेला निघायचे असल्याने पर्थ शहराकडे निघालो. डॅरेनतर्फे ठरलेले टार्गेट मागे टाकून नवा रेकॉर्ड सेट केल्याबद्दल आमच्यासाठी {अस्मादिक आणि विन्स्टन (सिंगापूर ऑफीसमधील सहकारी)} ही खास पार्टी होती. डॅनियल शीन (ऑस्ट्रेलिया), विन्स्टन कोह आणि अस्मादिक
प्रचि २७
मध्येच एका ठिकाणी ट्रॅफीक सिग्नलवर थांबलेलो असताना घेतलेला हा त्या दिवसातला शेवटचा फोटो.

विशाल...

लोकप्रिय पोस्ट