काही दिवसांपुर्वी कात्रजच्या बागेत एकदाचे बॉसचे दर्शन घ्यायचा योग आला. तिथे पोहोचलो तेव्हा ही गर्दी उसळली होती. मी कसातरी गर्दीतुन आपले डोके आणि डोक्यावर उचलुन धरलेला कॅमेरा काढून आत घुसलो. पण पुढे काहीच नव्हतं. शेजारच्याला हळुच विचारलं... (जणुकाही माझं बोलणं समोरच्या जंगलात कुठेतरी दडून बसलेल्या त्या सायबाला ऐकुच जाणार होतं!)
कुठेय?
कुटं जावुन बसलय की राव, पंचीस मिन्टं झाली हुबा हाये हितं, पण जनावर भायेर यायाला तय्यारच न्है....
मी ही इतरांच्यात सामील झालो. अजुन थोडा पुढे सरकलो. डोळे ताणून ताणून कुठे दिसताहेत का साहेब हे बघायचा प्रयत्न करायला लागलो. इतक्यात पब्लिकमध्ये कुजबुज झाली...
आला...आला.....
मी पटकन कॅमेरा सरसावला आणि शेजारच्याला थोडं बाजुला सारत पुढे घुसलो. त्याने आधी कुरकुर केली पण हातातला कॅमेरा पाहताच तो ही बाजुला झाला.
नीट काढुन घ्या साहेब फोटो, मला ईमेल कराल?
मी त्याच्याकडे बघत होकारार्थी हसलो आणि पुढे सरकलो. जाळीतुन साहेब बाहेर आले आणि मी फोटो काढायचा विसरुनच गेलो. ते लांबलचक, देखणं , रुबाबदार व्यक्तीमत्व दिमाखात समोर उभ होतं. मी भान हरपल्यासारखा बघतच राहीलो.
साहेब, काढताय ना फोटो? लवकर काढा, नाहीतर परत जाळीत शिरेल तो....
साहेब जाळीत असलेल्या पाण्याच्या खळग्यापाशी आले. आधी पाण्याभोवती एक चक्कर मारून आजुबाजुचा अंदाज घेतला.
पाण्याच्या त्या खळग्याला पुर्ण चक्कर मारत महाशय या बाजुला आले आणि शेपटी ताणत सायबांनी आळस दिला.
डोहाला पुर्ण चक्कर मारुन पुन्हा एकदा पलिकडच्या तीरावरून डोहात उतरायची तयारी ...
त्यानंतर महाशयांनी आधी आपली तहान भागवून घेतली...
तहान भागवल्यानंतर मात्र उकाड्यापासून बचाव करण्यासाठी साहेबांनी सरळ पाण्याच्या त्या डोहात डुबकी मारली आणि तिथेच ठाण मांडून बसले.
शेजार्याचे फोटो आधी काढले म्हणून हे साहेब मात्र आमच्यावर जाम रुसुन बसले आणि पाठ फिरवूनच बसले.
बराच वेळ वाट बघीतली पण साहेबांचा रुसवा दुर होण्याचे चिन्ह दिसेना. मग शेवटी कंटाळून पुढच्या वेळी तुमचा नंबर आधी लावू असे प्रॉमीस केले तेव्हा शिष्ठपणाने एक पाठमोरीच पोझ दिली साहेबांनी.
सात वाजुन गेले होते. तिथले सुरक्षा रक्षक उद्यान बंद करण्याची वेळ झाल्याचे इशारे देत फिरु लागले आणि आम्ही साहेबांचा निरोप घेतला.
इरसाल म्हमईकर...