नेहमी फुलांचेच फोटो काढत असतो, म्हणलं यावेळी पानांचेही काढावे. मग काय काढला कॅमेरा आणि सटा - सट.....
नको मोह त्या पुष्पराजाचा
हवी जराशी हिरवाई
कोवळिकेची आभा लालसर
इथेच असते तरुणाई

मज नको गुलाबी मादकता नकोच आता गंध शराबी मुग्ध कोवळ्या हिरवाईला कोंदण लाभले स्निग्ध गुलाबी
हा स्पर्श कोवळा
मज हवा-हवासा
शोध हिरवाईचा
हवा-हवासा....
हुश्श....
झाले एकदाचे !
नको मोह त्या पुष्पराजाचा
हवी जराशी हिरवाई
कोवळिकेची आभा लालसर
इथेच असते तरुणाई
मज नको गुलाबी मादकता नकोच आता गंध शराबी मुग्ध कोवळ्या हिरवाईला कोंदण लाभले स्निग्ध गुलाबी
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा