सखा ....

मंगळवार, १० ऑगस्ट, २०१०


स्थळ : कारेकल (Karaikal), चेन्नई पासुन साधारण ३५०-४०० किमी अंतरावर. (पॉंडिचेरीपासुन ५० किमी)
कॅमेरा : कॅनन A550 Powershot

कंपनीच्या कामानिमीत्त चेन्नईपासुन साधारण ४०० किमी अंतरावर असलेल्या कारेकलला जाण्याचा योग आला. सद्ध्या तिथे राजीव गांधी पोर्टचे काम सुरू आहे. पुर्ण झाल्यावर बहुदा हा पोर्ट भारतातल्या सर्वात मोठ्या पोर्टसपैकी एक ठरेल. तिथे आमच्या कंपनीची ओमनीस्टार जी.पी.एस. सिस्टीम वापरून (जेटी बनवण्यासाठी जे टेट्रॉपॉड्स टाकले जातात त्यांची दिलेल्या अक्षांश - रेखांशावरुन योग्य जागा ठरवून तिथे ते टेट्रापॉड्स सेट करणे) जेटीचा सर्व्हे करण्यात आला. त्यासाठी मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून गेलो होतो. तिथे एरव्ही शांत असलेल्या माझ्या सख्याची, सागराची काही विलक्षण रुपे पाहायला मिळाली.

टेट्रॉपॉड्स आणि अस्मादिक ....














माझा सखा ....
















तसा तो खुप शांत आहे....पण कधी कधी त्यालाही खोडकरपणाचा झटका येतो..
एखाद्या व्रात्य लेकरासारखा ...       















आणि मी ही चिडवलं किं मग मात्र तो पिसाळतो, अंगावर येतो कधी कधी ..
कधी रागाने ..!















कधी प्रेमाने..मायेने..!!!  














त्याचं रागावणंही अजब असतं, कधी सॉलीड भडकतो...
















तर लगेचच क्षणात शांतही होतो....
















पण शांत होतानाही खोडकरपणे सगळीकडे पसारा करुन ठेवतो, मग आवरताना नाकी नऊ येतात...
















तक्रार करायला जावे तर परत रागावल्याचं नाटक करतो...















माझी पाठ वळली की पुन्हा पहिल्यासारखा शांत होतो...
















मी त्याचे लाड करतो ना, म्हणुन त्याच्या या खोड्या चालतात..., तसा खोडकर आहे तो,
पण माझा सखा आहे..., अगदी सख्खा !


(कारेकल ब्रेक वॉटर्स, चेन्नईपासुन साधारण ४०० किमी अंतरावर)

विशाल कुलकर्णी






















0 प्रतिसाद:

टिप्पणी पोस्ट करा

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh