थियान हॉक केंग, सिंगापूर

शुक्रवार, ८ जुलै, २०११

थियान हॉक केंग टेंपल (Thian Hock Keng Temple)...
नाव वाचता वाचताच धाप लागली होती मला. ;) पण मंदीर पाहताना सगळा थकवा उडून गेला. :)
बहुदा चीनमधील फुजियान (उच्चार ?) प्रांतातील हॉक्कीन शैलीत बांधलेले हे सिंगापूरमधील चिनी लोकांचे एक अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध देवस्थान ! याचा अर्थ "स्वर्गीय आनंदाचे मंदीर" असा होतो.

१८१९ मध्ये जेव्हा ब्रिटीशांनी सिंगापुरला व्यापारी बंदर म्हणुन घोषीत केले तेव्हा त्यानंतर कित्येक चिनी प्रवासी व्यापारासाठी धोकादायक दक्षीणी चिनी समुद्र ओलांडुन सिंगापुरला येवु लागले.
असे म्हणतात की तत्कालीन (आणि आजही) चिनी लोक धोकादायक सागरी मार्गाने प्रवास करण्यापूर्वी सुरक्षित प्रवासासाठी 'माझु' या आपल्या समुद्रदेवतेची प्रार्थना करतात. ही देवी कोळ्यांची (फिशरमन्स गॉडेस) संरक्षक देवी म्हणुनही ओळखली जाते. तिला 'गॉडेस ऑफ लाईफ' (आयुष्याची देवता) ही म्हटले जाते. सन १८३९ मध्ये श्री. टॅन टोक सेंग आणि श्री. सी हु केह या दोन फुजियन सदगृहस्थांच्या पुढाकाराने सिंगापूरमध्ये हे मंदीर उभारण्यात आले.

मंदीर पुर्णपणे दक्षीण चिनी पद्धतीच्या वास्तुशैलीत बांधण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे एकही खिळ्याचा वापर न करता मंदीराच्या सर्व भिंतीवर अतिशय देखण्या आणि भव्य स्वरुपाचे कार्व्हिंग करण्यात आले आहे.

सौजन्य : विकीपिडीया

आपले स्वागत करते ते मंदीराचे प्रशस्त आणि अतिशय देखणे असे हे प्रवेशद्वार..

आत शिरल्यावर आपल्याकडे असते तसेच प्रशस्त अंगण आहे. आपल्याकडे मंदिराच्या अंगणात तुळस किंवा नंदी किंवा तत्सम मुर्ती असते. आणि त्याबरोबर उदबत्त्या लावण्यासाठी, अंगार्‍यासाठी एक पात्र ठेवलेले असते. तसेच इथेही एक भव्य आणि कोरीव काम केलेले धातुचे उदबत्तीपात्र - रक्षापात्र बघावयास मिळते.

समुद्रदेवता "मा झु" ची देखणी प्रतिमा

या मुख्य मंदिराच्या गाभार्‍यातही भिंतीवर सोनेरी मुलाम्यातले , चिनी शैलीचे सुंदर नक्षीकाम बघायला मिळते.
या मुळ मंदिराच्या मागच्या बाजुला (त्याच आवारात) बुद्धीस्ट लोकांचे "श्री बोधिसत्व देवतेचे" मंदीर आहे. बोधिसत्व ही आपल्या सरस्वतीप्रमाणे बुद्धीची देवता/दैवत मानली जाते.इथेही एक अलग रक्षापात्र आहे. चिनी लोकांमध्ये बहुदा आपल्याप्रमाणे ज्योती लावण्यापेक्षा उदबत्त्या लावण्याची प्रथा असावी.या रक्षापात्राच्या शिखरावर असलेल्या एका परंपरागत चिनी ड्रॅगनला टिपण्याचा प्रयत्न केल्यावाचून मला राहवले नाही.मुख्य मंदिराच्या गाभार्‍यात चिनी संस्कृतीत अतिशय पवित्र समजले गेलेले हे लाल रंगाचे आकाशदिवे ही बघायला मिळालेशेवटी मंदीराचा कळस...

आजुबाजुला उभ्या असलेल्या उत्तुंग इमारतींमध्ये वसलेले हे चिनी समुद्रदेवतेचे "स्वर्गीय आनंदाचे मंदीर" सद्ध्या सिंगापूरमधील पर्यटकांकडून सर्वात जास्त भेट दिली जाणारे मंदीर आहे.विशाल

0 प्रतिसाद:

टिप्पणी पोस्ट करा

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh