धुंद होवुन गरजतो पाऊस आहे
हाय ओला बरसतो पाऊस आहे...
रान हिरवे नाचले बेभान आता
मोर होउन लहरतो पाऊस आहे...!
जायचे ठरले होते लोहगडला ! पण निघायलाच उशीर झाल्याने भाज्याच्याच परिसरात भटकायचे असे ठरवले आणि उंडगायला निघालो.
प्रचि १
पायथ्याला गाडी लावून सर्वप्रथम गरमागरम चहा मारला आणि पुढे निघालो. तर समोर उफ़ाणत कोसळणारा धबधबा स्वागताला उभाच होता...
कुठल्याही भटकंतीची सुरूवात अशी सुरेख होणे यासारखे भाग्य नाही. नकळत उल्हास दरीची आठवण झाली, तिथे धबधबा शेवटी भेटला होता, तर इथे स्वारी स्वागतालाच हजर होती.
प्रचि २
प्रचि ३
भाजे लेण्यांकडे जाताना सहज उजव्या बाजुला नजर गेली. सगळीकडे हिरवीगार राने पसरलेली. पाऊस मी म्हणत होता. त्या हिरवाईत लपलेलं मंदीर टिपायचा मोह काही आवरला नाही.
प्रचि ४
डोंगराला जागोजागी फ़ुटलेले पाझर मन प्रसन्न करुन टाकत होते.
प्रचि ५
आजुबाजुची हिरवाई इतकी मनोरम होती की मुळापासून उखडून पडलेल्या या ओंडक्याला देखील मोह सोडवत नसावा.
प्रचि ६
फ़िरत फ़िरत एकदाचे भाजे लेणींपाशी येवून पोचलो.
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
एका नैसर्गिक गुहेवरून ओघळणारे पावसाचे थेंब टिपण्याची संधी मीही सोडली नाही
प्रचि १०
प्रचि ११
लेण्यांच्या सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर असलेला हा अजुन एक धबधबा
प्रचि १२
इथुन आता लोहगडाकडे जाणारी नागमोडी वाट स्पष्ट दिसत होती.
प्रचि १३
या वाटेवर मध्येच भेटणारा हा अजुन एक धबधबा...
प्रचि १४
धुक्यात हरवलेला लोहगड ! लोहगडाकडे पाहताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि नकळत अंग शहारून उठले. मनोमन पुढच्या वेळी लवकरात लवकर लोहगडाला भेट द्यायच्या निश्चयाची पुनरावृत्ती झाली.
प्रचि १५
भाज्याच्या लेण्यांपाशी जमीनीवर पसरलेले पावसाचे पाणी
प्रचि १६
तृप्त अस्मादिक
लोहगडावर कधी जायचं पुन्हा?
विशाल...

2 प्रतिसाद:
प्रचि १५ , एकदम भारी!
कधी करताय परत लोहगड मग!
चला मालक ! तुम्ही म्हणाल तेव्हा जाऊ ;)
आभार्स रे !!
टिप्पणी पोस्ट करा