कासचे सौंदर्य माझ्या नजरेतून.....

सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

परवा दिवशी अचानक सुहास झेलेचा (एक ब्लॉगर मित्र) फ़ोन आला की आम्ही रवीवारी ’कास पठार’ला निघालो आहोत म्हणून. आमचाही रवीवारचा मेनु तोच होता म्हणून म्हटले भेटू आपण. पण तिथे गेल्यावर नेमकी त्रेधा उडाली. गाडी खालीच पार्क करावी लागली. तेथुन पुढे कास पठारापर्यंत बसने. त्यातही ट्रॅफ़ीक जाममुळे बस मध्येच सोडून चालत निघालो. नेमकी दोन पिल्लं बरोबर असल्याने फ़ारसे चालत फ़िरणे शक्य नव्हते. सुझेचा वारंवार फ़ोन येत होता , कुठे आहेस म्हणून? पण बरोबरच्या दोन पिल्लांमुळे फ़िरण्यावर मर्यादा आली होती. त्यामुळे कास तर झाले पण मित्रांची भेट हुकली. वाईट वाटले ! क्षमस्व मित्रहो...!!

प्रचि १
कासकडे जातानाच्या वाटेवर टिपलेले एक लॅंडस्केप...


प्रचि २
कास पठारावर गाडी थांबवता येत नाही असे तिथे उपस्थित वनसंरक्षकांनी खोटेच सांगितल्यामुळे गाडी कास पठाराच्या अलिकडे २-३ किमी अंतरावरील गाडीतळावर सोडावी लागली. तिथून पुढे चालत किंवा बसने जावे लागते. आमच्याबरोबर दोन लहान पिल्लं असल्याने आम्ही बसचा पर्याय निवडला. तत्पुर्वी त्या गाडीतळाच्या थोडेसे अलिकडे एका ठिकाणावरून वरून दिसणारे कासच्या तलावाचे विहंगम दृष्य टिपायला विसरलो नाही.


प्रचि ३


प्रचि ४
बसने कास पठाराकडे निघालो खरा. पण एवढासा अरुंद रस्ता आणि त्यात दोन्ही बाजुने येणारी-जाणारी वाहने यामुळे बस अर्ध्यावरच सोडली. दोन्ही पिल्ले (एक माझी भाच्ची आणि एक मित्राचा लेक) एक माझ्या आणि दुसरे नानाच्या (माझा मित्र) खांद्यावर बसवून अकरा नंबरच्या बसमध्ये बसलो. ;) आणि वन-टू, वन-टू करत कास पठाराकडे मोर्चा वळवला.
एकदाचे इप्सित ठिकाणी पोचलो आणि सगळे श्रम दुर झाले.


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


प्रचि ८


प्रचि ९


प्रचि १०
माझा मायक्रो फोटोग्राफीचा अयशस्वी प्रयोग


प्रचि ११


प्रचि १२


प्रचि १३


प्रचि १४


प्रचि १५


प्रचि १६


प्रचि १७


प्रचि १८


प्रचि १९


प्रचि २०


प्रचि २१


प्रचि २२


प्रचि २३


प्रचि २४


तरी ठोसेघरच्या रौद्रपुरूषाला भेट द्यायचे यावेळी राहीलेच. :(

विशाल

1 प्रतिसाद:

अनामित म्हणाले...

विशालदा,मस्तच आलेत कि रे छायाचित्र ... त्यादिवशी तुझी भेट झाली असती तर अजून धमाल आली असती ... :)

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट