हिमगौरीच्या शोधात.....

सोमवार, २३ जानेवारी, २०१२

डेनव्हर एअरपोर्टमधून बाहेर पडून अलामोच्या बेसकडे (डेनव्हरमधील कार भाड्याने देणार्‍या एका कंपनीचे नाव) निघालो. रस्त्याकडे बघतानाच पुढच्या १०-१२ दिवसात समोर काय वाढून ठेवलेले आहे याचा अंदाज येत होता.
प्रचि १


सुरुवातीचे दोन दिवस तसे शांत आणि स्वच्छच गेले. पण तिसर्‍या दिवशी हॉटेलच्या बाहेर पडलो आणि समोरचा नजारा काही औरच होता.
प्रचि २


कॅमेर्‍याच्या डिसप्लेवर फोटो बघितला आणि बावचळलोच. म्हणलं काचेआडून घेतल्यासारखा का वाटतोय फोटो असा? लेन्स बघीतली तेव्हा लक्षात आलं की त्यावर हिम साचलं होतं. ते टीपकागदानं साफ करुन घेतलं आणि पुढचे फोटो टिपायला सुरुवात केली. त्यादिवशी दिवसभर माझे डोळे हिमगौरीच्या शोधातच होते.

प्रचि ३


जिकडे बघाल तिकडे बर्फच बर्फ.... ! आयुष्यात प्रथमच हिमवृष्टीचा अनुभव घेत होतो. मस्त वाटत होतो.
प्रचि ४


हिम 'भारले' रस्ते, हिमाने माखलेल्या मोटारी......
प्रचि ५


जिकडे पाहावे तिकडे बर्फच बर्फ.....
प्रचि ६


दुरवर बर्फाच्छादीत पर्वतरांगापाशी मात्र सुर्यकिरणांचा प्रभाव जाणवत होता.
प्रचि ७


आमचे (ट्रिंबलचे) मुख्यालय अगदी निसर्गाच्या सानिध्यात वगैरे म्हणतात तसे रॉकीजच्या प्रांगणातच आहे. हॉटेलपासुन तिथे जायला साधारण ३० मिनीटे लागायची कारने. जातानाच्या रस्त्यावर टिपलेली ही काही प्रकाशचित्रे....
प्रचि ८


प्रचि ९


प्रचि १०


हापिस जवळ आलं. समोर दिसणार्‍या बर्फाच्छादीत पर्वतरांगा खुणावत होत्या. तिकडे शेवटच्या दिवशी जायचे असे ठरवून ड्रायव्हरला गाडी अतिशय कठीण मनाने ऑफीसकडे वळवायला सांगीतली.
प्रचि ११


प्रचि १२


'बोर इंटरनॅशनल' असे बोअर नाव असलेल्या कंपनीचे ऑफीस एवढे सुंदर दिसत असेल याचे हसु आले.
प्रचि १३


प्रचि १४


तोपर्यंत गाडी आमच्या पोर्चमध्ये येवुन थांबली होती. इथेही पाहावे तिकडे हिमाचेच साम्राज्य होते. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले बर्फ.
प्रचि १५


बर्फाने तात्पुरत्या जायबंदी ;) केलेल्या मोटारी.....
प्रचि १६


हिवाळा असल्यामुळे पानगळीचे दिवस होते. झाडे पानाविना उघडी पडलेली. पण पानांची जागा आता बर्फाने घेतली होती......
प्रचि १७


प्रचि १८


प्रचि १९


प्रचि २०


प्रचि २१


प्रचि २२


दुसर्‍या दिवशी जरा हिमवृष्टी कमी झाली, आणि रस्ते , झाडे हळु हळु पुनर्पदावर येवु लागले.
प्रचि २३


माझा बॉस (आता एक खुप चांगला मित्रदेखील) आणि अस्मादिक......
प्रचि २४


हिमगौरीची पावले सगळीकडे दिसत होती, पण मीच फारसा खोलात शिरायचा प्रयत्न केला नाही. नाहीतर भारतातल्या माझ्या 'गौरी'ने कालिकेचे रुप धारण केले असते. :P

क्रमश :

विशाल

0 प्रतिसाद:

टिप्पणी पोस्ट करा

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh