हिमगौरीच्या शोधात : भाग २

सोमवार, २३ जानेवारी, २०१२

हिमगौरीच्या शोधात भटकत असताना अचानक एक बातमी कानी आली की आमच्या सततच्या त्रासाने त्रस्त होवून हिमगौरीने वेशांतर केले आहे आणि ती एका ठिकाणी दडून बसली आहे. हाती आलेल्या अनेक स्थळापैंकी एक स्थळ आम्ही नक्की केले आणि तडक निघालो हिमगौरीच्या शोधात....
प्रचि १


प्रचि २
बिचारी हिमगौरी ! विकुमांत्रिकाच्या भितीने तिला आपला राजमहाल सोडून एका सार्वजनिक ठिकाणाचा आश्रय घ्यावा लागला होता बहुदा.


प्रचि ३
इथे आम्हाला घाबरवण्यासाठी दारातच एक रक्षक उभा केला होता. पण बहुदा हिमगौरी त्यात प्राण फुंकायचे विसरूनच गेली असावी.


प्रचि ४
संभाविताप्रमाणे ८ डॉलर भरुन आत शिरण्याचा परवाना घेतला आणि आमचे सर्व गुप्तहेरी कौशल्य पणाला लावत आम्ही आत शिरलो. पहिल्या दालनातच मोठी निराशा झाली. हिमगौरीच्या ऐवजी भलतेच सात पेक्षा जास्त पाय असणारे कितीतरी बुटके तिथे आमची वाट पाहात होते.
सॅल्मॉन पिंक बर्ड ईटर टारांटुला....


प्रचि ५
मेक्सिकन पिंक टारांटुला


प्रचि ६
मॅकलेज स्पेक्टर वॉकींग स्टिक अर्थात काडी किडा


प्रचि ७
मादागास्कर हिस्सींग कॉक्रोच (इइइइइइइ......)


प्रचि ८
हॉर्स शु क्रॅब


प्रचि ९
या सायबांचं नाव नाय कळ्ळं.... :(


प्रचि १०
इथुन कशीबशी सुटका करुन घेतली आणि दुसर्‍या दालनात शिरकाव करुन घेतला. आन द्येवा, याड लागायचीच येळ आली की. इथे वेश बदलुन बसलेली हिमगौरी होती, पण एकटी नव्हे....इथे तिचे असंख्य डुआयडीज होते. आम्हाला तर काय करावे तेच सुचेना. मग शेवटी ठरवले की आता दिसतील त्या सर्वांचे फोटो काढून घेवु यात, मग ठरवता येइल यातली हिमगौरी कुठली ते.....


प्रचि ११


प्रचि १२


प्रचि १३


प्रचि १४


प्रचि १५


प्रचि १६


प्रचि १७


प्रचि १८


प्रचि १९


प्रचि २०


प्रचि २१
हितं तर येकदम रुपच बदलुन टाकलं की वो.
आफ्रिकन मुन मॉथ


प्रचि २२


प्रचि २३


प्रचि २४


प्रचि २५


प्रचि २६


प्रचि २७


प्रचि २८


प्रचि २९


प्रचि ३०


प्रचि ३१


हाय रे दैवा ! आम्हाला वश असलेल्या कर्णपिशाच्चाने नवी बातमी आणली होती. ती म्हणजे आम्ही जिला शोधतोय ती हिमगौरी इथे नाहीच आहे मुळी. आम्ही झटक्यात कॅमेरा बंद केला आणि बाहेर पडलो.

नव्या दमाने, नव्या दिशेने पुनश्च शोधाशोध सुरु ....
प्रचि ३२


हिमगौरी....कुठे आहेस तू?

क्रमशः

विशाल

0 प्रतिसाद:

टिप्पणी पोस्ट करा

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh